Monday, January 2, 2012




पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,
तो कुठे वाहतोय..
सहज विचारलं तर म्हणाला,
मीही तेच पाहतोय...............!S!♥!K!


कधी किनारा सोडून जावू नको
रोज रोज मला सतावू नको
तुझी माझी भेट हे अशीच होत राहील
रोज च भेट होते आपली सागर किनारी
मी तुझीच आहे पण तुला ओढ त्या आकाशा ची
का संशय घेतोस माझ्या चंद्रा बरोबर च्या मैत्री वरी
का भांडतोस चन्द्रा बरोबर करून भरती आहोटी
मी तुझ्या प्रेमात ७१% बुडालेली
आणि तू च करतोस जीवापाड लाड माझे प्रत्येक टोकावरी
फुल ले आपले प्रेम या शांत वालु वरी
म्हणून तर विसावतात लाखो प्रेमी मने आपल्या या संगम वरती ..
मी फक्त तुझीच धरती ...मी फक्त तुझीच धरती ...!♥!



आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो, मावळणारा रवी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी............!♥!

आवडतो मज अफ़ाट सागर,
आवडतो मज अफ़ाट सागर........!! ( Sagar Kadam )

सागर कदम ( Sagar Kadam )

T-19 Tigress Photo by Sagar Kadam — National Geographic Your Shot : Ranthambore National Park - India

T-19 Tigress Photo by Sagar Kadam — National Geographic Your Shot : Ranthambore National Park - India