जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे....!♥!